महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या ‘भामटी’ या विमुक्त भटक्या जमातीचा “समाज एकत्रीकरण मेळावा” दिनांक 26 मे 2024 ला उमरेड, जिल्हा नागपूर, येथे ओम परमात्मा एक सभागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकाने झाली. कु. शीतल तराळ हिने संविधान वाचन केले. मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व थोर बापूरावजी श्रीखंडे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय सोपानजी खिलारे यांनी भूषविले. मंचावर उपस्थित पाहुणे मा. शिवाजी वटाणे, मा. पुरुषोत्तम लहे, मा. डॉ. संतोष पजई, मा. डॉ. विजय पवाने, मा. डॉ. विलास झोडपे, मा. डॉ. शंकर पजई, मा. शालिकराम भराडे, मा. शालीकराम कुरई, मा. डॉ. वासुदेव डहाके, मा. मुरलीधर श्रीखंडे, मा. विष्णु मोरे, मा. रामेश्वर मराठे, मा. प्रा. पुंडलिक मळवे, मा. श्री. विजय नाईक, मा. दिलीप मते, मा. मुरली मते व मा. धनराज कावटे होते.
मेळाव्याचे औचित्य साधून भामटी समाजाची स्वतंत्र वेबसाईट निर्माण व लोगो चे उद्घाटन करण्यात आले. या करिता मा. राजेंद्र पजई, मा. रामेश्वर मराठे, मा. रितेश उमाटे, यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून श्री. धनराज कावटे यांनी मेळावा आयोजनामागील भूमिका, मेळावा आयोजन व समाज एकत्रितरणाची गरज, भविष्यातील व सद्यस्थितीत येणाऱ्या अडचणी शासन स्तरावरील अडचणी याबाबत माहिती दिली.
सन 2016 ला झालेल्या जिंतूर येथील भामटी समाज मेळाव्याच्या आयोजन व सफलतेवर डॉ. विजय पवाने यांनी प्रकाश टाकला. सामाजिक समस्यांचे विचार मंथन डॉ. संतोष पजई यांनी, तर शैक्षणिक समस्यांचे विचार मंथन मा. शिवाजी वटाणे यांनी केले. समाज एकत्रीकरण व सर्वसमावेशकता याची गरज मा. मोहन तराळ यांनी स्पष्ट केली, तर “भामटी समाज एक प्रकाश यात्रा” या विषयावर मार्गदर्शन डॉ. वासुदेव डहाके यांनी केले.
समाज एकत्रीकरण मोहिमेत सहभागी मा. अरुण गुढेकर, मा. प्रकाश बजारे, मा. सुभाष राजेरामजी कावटे, मा. संजय टोणपे, मा. गणेश मवई यांचा सन्मान करण्यात आला. समाजाच्या समस्या व उपाय याकरिता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा शेवट झाला. कार्यक्रमाचे संचलन सौ. सारिका कावटे व सौ. मयुरी डेहनकर यांनी तर आभार सौ. अपर्णा उमाटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री. श्रीकांत झोडपे, श्री. पुरुषोत्तम कावटे, श्री. श्रीराम गोहणे,
श्री. संजय लहे, श्री. विलास श्रीखंडे, श्री. कुणाल कावटे, श्री. पंकज गोहणे, श्री. यश कावटे, श्री. संदिप श्रीखंडे, श्री. डॉ. संदिप कावटे, श्री. मनोहर बजारे, श्री. गजानन राऊत, श्री. डोमाजी श्रीखंडे, श्री. रामजी पजई, श्री. नंदलाल मंद्रे, श्री. अजय पजई, श्री. मदन मोरे, श्री. विलास भराडे, श्री. श्रीकांत झोडपे, श्री. प्रविण खिराळे, श्री. महेंद्र मंद्रे, श्री. विनोद झोडपे, श्री. जयंत मते, श्री. दिपक मवई, श्री. हरिभाऊ पजई, श्री. चेतन कावटे, श्री. विपीन बजारे, श्री. प्रविण गवखरे, श्री. संजय कोमटी, श्री. संजय चांभारे, श्री. हर्षल बेलखुडे, श्री. विवेक उमाटे, डॉ. महेश बिपटे, श्री. अरुण बेलखुडे, श्री. गोपाल पजई, श्री. नितेश पवाने, श्री विलास खिराळे , श्री शुभम पजई यांनी सहकार्य केले.